Sinhagad Fort : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताय? तर थांबा… पर्यटकांना नो एन्ट्री, कारण काय?

Sinhagad Fort : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताय? तर थांबा… पर्यटकांना नो एन्ट्री, कारण काय?

| Updated on: May 28, 2025 | 10:50 AM

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी गुरुवारी आपत्ती निवारणाचा शासकीय पाहणी दौरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 29 मे रोजी सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे,

पुणे शहर आणि घाट परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने, पुण्यातील सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणीसाठी आणि यासंदर्भात करण्यात येणाऱ्या दौऱ्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या सिंहगड किल्ल्यावर पाहणी केली जाणार आहे.

दरम्यान, उद्या 29 तारखेला पर्यटनासाठी सिंहगड किल्ला बंद राहणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सध्या सुट्या आणि पावसाचे दिवस असल्याने पर्यटकांचा सिंहगडकडे ओढा वाढला आहे. यामध्ये पावसाळ्यात काढण्यात येणाऱ्या ट्रिप आणि ट्रेंकिगला येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला बंद राहणार आहे. कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे.

Published on: May 28, 2025 10:43 AM