मंदिरासमोरील झाडावर नागाने ठोकला तीन दिवस मुक्काम, तर्क-वितर्कांना उधाण; तुगाव हालसीमधील घटना

| Updated on: Jan 11, 2022 | 11:10 PM

भालकी तालुक्यातल्या तुगाव-हालसी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका मदिंरासमोर असलेल्या झाडावर नाग प्रजातीच्या सापाने तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. या घटनेचे गावकऱ्यांमधून देखील अश्चर्य व्यक्त होत आहे

Follow us on

लातूर : भालकी तालुक्यातल्या तुगाव-हालसी (Tugav Halsiगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका मदिंरासमोर असलेल्या झाडावर नाग प्रजातीच्या सापाने (snake on a treeतब्बल तीन दिवस मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. या घटनेचे गावकऱ्यांमधून देखील अश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान काही केल्या हा नाग या झाडावरून हालत नसल्याने गावकऱ्यांकडून या नागारीच पूजा करण्यात आली. या नागाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर एकाच झाडावर तीन दिवस राहिल्यानंतर हा नाग तिसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी निघून गेला.