Solapur News : अवघ्या 12 वर्षाच्या मुलीनं दिला बाळाला जन्म, बाळ अन् आई सुखरूप; नवऱ्यासह पालकांवर गुन्हा; सोलापुरात खळबळ

Solapur News : अवघ्या 12 वर्षाच्या मुलीनं दिला बाळाला जन्म, बाळ अन् आई सुखरूप; नवऱ्यासह पालकांवर गुन्हा; सोलापुरात खळबळ

| Updated on: Sep 22, 2025 | 10:14 PM

सोलापूरच्या माढा तालुक्यात 12 वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, बालविवाहाचा प्रकार उघड झाला आहे. मुलीचे वडील, पती, सासू आणि सासरे यांवर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. बारा वर्ष आठ महिन्याच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला आहे. ही घटना माढा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत घडली. या घटनेनंतर बालविवाहाचा प्रकार उघड झाला आहे. मुलीचे वडील, अंकुश रामा कोळी, तिचा पती रवींद्र तुकाराम पवार, सासू सुमन पवार आणि सासरे अंकुश तुकाराम पवार यांवर माढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या पालकांवर बालविवाह कायद्यानुसार, तर तिच्या पतीवर बाल लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे आरोप आहेत. सध्या मुलगी आणि तिचे बाळ सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून दोघीही सुरक्षित आहेत.

Published on: Sep 22, 2025 10:14 PM