NIAची सोलापुरात मोठी कारवाई! पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत आणखी एकाला अटक?

| Updated on: Sep 27, 2022 | 8:12 AM

महाराष्ट्रात एनआयएची पीएफआयविरोधात कारवाई सुरुच? सोलापुरात एका संशयिताला अटक केल्याची माहिती, नेमका आरोप काय?

Follow us on

सागर सुरवसे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : सोलापूरमध्ये एनआयएने (Solapur NIA) मोठी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पीएफआयशी (PFI) संबंधित काम करणाऱ्या एकाला अटक (arrest) करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला एनआयएच्या पथकाकडून दिल्लीत नेण्यात आलं आहे, असं सूत्रांनी सांगितलं. या संशयिताची एनआयएकडून कसून चौकशी केली जाईल. त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या राजकीय संघटनेविरोधात एनआयएने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रासह देशभरात एनआयएने छापेमारी केली होती. त्यानंतर आता सोलापुरात एनआयएने केलेल्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आतापर्यंत अनेक जणांना एनआयएनं पीएफआयसोबत संबंध असल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय. टेरर फंडिंगच्या माध्यमातून पीएफआय काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यातून एनआयएकडून छापेमारी आणि कसून तपास सुरु आहे. सोलापुरात करण्यात आलेली कारवाई त्याच्याच भाग असल्याचं सांगितलं जातंय.