धक्कादायक! हॉटेल मॅनेजरला मालकाची नग्न करून मारहाण

धक्कादायक! हॉटेल मॅनेजरला मालकाची नग्न करून मारहाण

| Updated on: Nov 16, 2025 | 2:13 PM

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे एका हॉटेल मालकाने कामगाराला नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हॉटेल मालक लखन हरिदास माने याला ताब्यात घेतले आहे. निवास नकाते या कामगारावर तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या अमानुष हल्ल्याप्रकरणी कठोर गैर-जामीनपात्र कलमे लावली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेलमध्ये एका कामगाराला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेल मालक लखन हरिदास माने याने कामगार निवास आप्पासाहेब नकाते याला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली.

तपासात समोर आले की, ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती. काम नीट करत नाही या कारणावरून मालकाने कामगाराच्या खिशातील ₹2000 काढून घेतले, त्याचे कपडे काढले आणि त्याला इतर कामगारांसमोर नग्न करून मारहाण केली. तसेच, तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन, दारू पिऊन चूक झाल्याची कबुली देणारा व्हिडिओही जबरदस्तीने बनवून घेतला होता.

निवास नकाते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लखन हरिदास माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्यावर जबरदस्तीने पैसे काढून घेणे, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, हत्याराने दुखापत करणे, कैद करणे, अवमान करणे आणि बदनामी करणे अशी अनेक गैर-जामीनपात्र कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास एपीआय चौधरी करत आहेत. पीडित कामगार भीतीपोटी अजूनही त्याच हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती आहे.

Published on: Nov 16, 2025 02:13 PM