Solapur Politics : भाजपनं दिवाळीपूर्वीच फोडला राजकीय बॉम्ब, राष्ट्रवादी अन् शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ
सोलापूरमध्ये भाजपने दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फोडत राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतील प्रमुख नेत्यांना पक्षात घेतले आहे. माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सोलापूर शहरासह जिल्ह्यात भाजपने दिवाळीपूर्वीच मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर शिंदे गटातील शिवसेनेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी आणि कल्पना शिरसागर या प्रमुख नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सोलापूरमधील या पक्षप्रवेशांमुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत.
Published on: Oct 17, 2025 12:27 PM
