बैल 60 फूट खोल विहिरीत पडला, अखेर क्रेन बोलावली, तब्बल तीन तासानंतर बाहेर काढण्यात यश

बैल 60 फूट खोल विहिरीत पडला, अखेर क्रेन बोलावली, तब्बल तीन तासानंतर बाहेर काढण्यात यश

| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 5:00 PM

सोलापूर जिल्ह्यातील गुळवंची गावातील एका साठ फूट खोल विहिरीमध्ये बैल पडला होता.या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या साहाय्याने उचलून त्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील गुळवंची गावातील एका साठ फूट खोल विहिरीमध्ये बैल पडला होता.या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या साहाय्याने उचलून त्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आलं आहे. गुळवंची तांडा येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये गोशाळेमधील बैल (वळू) पडल्याची माहिती डब्लूसीए आणि आणि अँनिमल राहत संस्थेच्या सदस्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बैल विहिरीबाहेर काढण्याचा कामाला सुरुवात केली. दरम्यान,मोठ्या ऊंची वरून बैल विहिरीत पडल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती,त्यामुळे बचावकार्यासाठी कार्यकर्ते विहिरीमध्ये उतरल्या नंतर बैल चवताळला होता. मात्र,बैलाला गोंजारून त्याच्या पाठीवरून हाथ फिरवल्यामुळे तो शांत झाला.त्यानंतर त्याला बेल्ट लावून क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठीच्या मोहिमेला जवळपास अडीच ते तीन तासांचा कालावधी लागला. बैलाला बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी त्याच टाळ्या वाजवून स्वागत केलं. वैद्यकीय उपचार देऊन बैलाची गोशाळेमध्ये परत रवानगी करण्यात आली आहे.

Published on: Jul 12, 2021 04:59 PM