Pahalgam Attack : पहलगाममध्ये हल्ला अन् काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, ‘आम्ही पुन्हा येणार, I Love Kashmir’
पहलगाम येथे हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते आणि इंडिगोचे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन सुखरूप मुंबईत दाखल झाले.
महाराष्ट्रातील आणखी काही पर्यटक जम्मू काश्मीर येथे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. पहलगाम येथे हल्ला झाला पण सुदैवाने जे बचावले त्यांनी महाराष्ट्रात परत येताच आपले स्वानुभव माध्यमांसोबत शेअर केले. यामध्ये कोणी सांगितले की, आम्हाला आमचा धर्म विचारला आणि त्यानंतर गोळ्या घातल्या तर काहींनी हल्ला करण्यास आलेल्या दहशतवाद्यांनी आजाण म्हणायला लावली असे सांगितले. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर येथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसह सरहद संस्थेचे सदस्य वैभव वाघ यांच्याकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ जिथे शूट करण्यात आला तेव्हा ते श्रीनगरच्या एका हॉटेलमध्ये होते. ज्यावेळी हल्ला झाला त्या ठिकाणापासून दोन किमीवर हे सर्व लोकं होती. त्यावेळी नेमकं काय घडलं हे त्यांनी सांगितले आहे. बघा व्हिडीओ नेमक्या काय होत्या भावना? कसा आला अनुभव?
Published on: Apr 25, 2025 04:51 PM
