Allu Arjun Arrest : अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा, ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी, प्रकरण काय?
हैदराबाद थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकणात अल्लू अर्जुनला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्याने अल्लू अर्जुनच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
साऊथ सुपरस्टार, अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हैदराबाद थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकणात अल्लू अर्जुनला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्याने अल्लू अर्जुनच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनला आज दुपारी अटक कऱण्यात आलं होतं. अल्लू अर्जुनला जवळून पाहण्यासाठी फॅन्सने मोठी गर्दी केली होती. या गर्दीवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ‘पुष्पा २’च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्या महिलेसोबत तिचा मुलगा होता तो या घटनेत गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा नोंदवला आणि नंतर त्याला अटक केली होती.
