Special Report | 13 अपक्ष आमदार ठरवणार कोण जिंकणार?-tv9

| Updated on: Jun 17, 2022 | 8:45 PM

अपक्ष आमदार देवेंद्र भुयारांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना आता डिवचणं सुरु केलंय... राज्यसभेप्रमाणंच अपक्ष आमदारांवर विधान परिषदेची निवडणूक अवलंबून आहे. देवेंद्र भुयारांनी शिवसेनेला मत दिलं नसल्याचा आरोप राऊतांनी राज्यसभेच्या निकालानंतर केला होता.

Follow us on

अपक्ष आमदार देवेंद्र भुयारांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना आता डिवचणं सुरु केलंय…
राज्यसभेप्रमाणंच अपक्ष आमदारांवर विधान परिषदेची निवडणूक अवलंबून आहे. देवेंद्र भुयारांनी शिवसेनेला मत दिलं नसल्याचा आरोप राऊतांनी राज्यसभेच्या निकालानंतर केला होता. त्यामुळं आता विधान परिषदेसाठी राऊतांना मतदानावेळी सोबत नेण्याची परवानगी द्यावी, असा टोला भुयारांनी लगावलाय. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिकांकडून संजय पवारांचा पराभव झाला..त्यानंतर, राऊतांनी मतं न मिळाल्याचा आरोप करुन नावंच घेतली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. सचिन अहिर आणि आमशा पाडवी सेनेचे उमेदवार आहेत. 27 च्या कोट्यानुसार शिवसेनेकडे मतं आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. आणि राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार आहेत. त्यातच जेलमध्ये असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार कोर्टानं नकारला. त्यामुळं राष्ट्रवादीची 2 मतं कमी झाली.