Special Report | प्रसाद लाडांना गर्भित इशारा, ‘बाटग्यां’वरून सामना!
संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला आमदार नितेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर शिवसेनेतील आयारामांची आणि त्यांना मिळालेल्या पदांची यादीच टाकली आहे. हे आरोप-प्रत्यारोप प्रामुख्यानं आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या एका व्यक्तव्यानंतर सुरु झाले आहे.
‘भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे’, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्याकडे होता. संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला आमदार नितेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर शिवसेनेतील आयारामांची आणि त्यांना मिळालेल्या पदांची यादीच टाकली आहे. हे आरोप-प्रत्यारोप प्रामुख्यानं आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या एका व्यक्तव्यानंतर सुरु झाले आहे.
Published on: Aug 02, 2021 09:32 PM
