Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती राजवटीचा इशारा!

Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती राजवटीचा इशारा!

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 10:57 PM

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशावेळी महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाकीत आमदार रवी राणा यांनी वर्तविले आहे. रवी राणा आज दिल्लीहून परतले. विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदार रवी राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकीत वर्तविले.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशावेळी महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाकीत आमदार रवी राणा यांनी वर्तविले आहे. रवी राणा आज दिल्लीहून परतले. विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदार रवी राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकीत वर्तविले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहे. महाराष्ट्राचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अंतर्गत चांदूरबाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक 1 यांनी दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये 25 हजार एवढा दंड केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकीत वर्तविले.