Special Report | दोन्ही राणेंनंतर आता ‘तिसरे’ राणे टार्गेट?

Special Report | दोन्ही राणेंनंतर आता ‘तिसरे’ राणे टार्गेट?

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 10:37 PM

भाजपा नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात थेट शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचं वक्तव्य केलंय. आमदार नितेश राणे यांच्याकडून देखील अशा प्रकारची विधानं केली गेल्यामुळ मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. सध्या ते ईडी कोठडीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचं वातावरण तापलेलं असतानाच भाजपा नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात थेट शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचं वक्तव्य केलंय. आमदार नितेश राणे यांच्याकडून देखील अशा प्रकारची विधानं केली गेल्यामुळ मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.