Special Report | 2 वर्ष जेल अन् 3 वर्ष जामिनानंतर छगन भुज’बळ’ वापसी!

| Updated on: Sep 09, 2021 | 11:03 PM

तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचं… दरम्यानच्या काळात मला, माझ्या कुटुंबाला, छोट्या लेकरांना खूप त्रास झाला पण आपल्या सगळ्यांचं किती आयुष्य आहे… कशाचा कुणाचा द्वेष करायचा…. म्हणून माझ्या मनात कुणाबद्द्ही द्वेष नाही… राग नाही, असंही भुजबळ म्हणाले. यानिमित्तानं महाराष्ट्र सदन घोटाळ्यापूर्वीचे भुजबळ आणि तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरचे भुजबळ... याविषयीचा हा खास रिपोर्ट

Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं, असं सांगताना या सगळ्या प्रकरणानंतर आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही…. कोणावरही लोभ नाही, असंही ते म्हणाले.

कंत्राटदाराला एक फूटही एफएसआय मिळाला नाही… आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आले… यासगळ्या प्रकरणात विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. पण गणेशोत्सच्याआधी आमच्यावरचं संकट दूर झालं… सत्य परेशान हो सकता हैं… लेकीन पराजित नही…, असं भुजबळ म्हणाले.

तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचं… दरम्यानच्या काळात मला, माझ्या कुटुंबाला, छोट्या लेकरांना खूप त्रास झाला पण आपल्या सगळ्यांचं किती आयुष्य आहे… कशाचा कुणाचा द्वेष करायचा…. म्हणून माझ्या मनात कुणाबद्द्ही द्वेष नाही… राग नाही, असंही भुजबळ म्हणाले. यानिमित्तानं महाराष्ट्र सदन घोटाळ्यापूर्वीचे भुजबळ आणि तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरचे भुजबळ… याविषयीचा हा खास रिपोर्ट