Special Report | Raj Thackeray यांच्या सभेच्या परवानगीसाठी मनसेची ‘परीक्षा’!-TV9
1 मे रोजीच्या औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेवरुन सस्पेंस कायम आहे...मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंच्या सभेला सरकार रोखणार नाही. दुसरीकडे मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर स्टेजचं काम मनसेकडून सुरु झालंय. पोलिसांनी या मैदानाची पाहणीही केलीय, 1 मे ला महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश, जातीवरुन वक्तव्य करु नये प्रक्षोभक भाषण स्टेजवरुन कोणीही करु नये.
1 मे रोजीच्या औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेवरुन सस्पेंस कायम आहे…मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंच्या सभेला सरकार रोखणार नाही. दुसरीकडे मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर स्टेजचं काम मनसेकडून सुरु झालंय. पोलिसांनी या मैदानाची पाहणीही केलीय, 1 मे ला महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश, जातीवरुन वक्तव्य करु नये प्रक्षोभक भाषण स्टेजवरुन कोणीही करु नये. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. व्यक्ती किंवा कोणत्याही समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करु नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावेत. सभेआधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही, सामाजिक वातावरण बिघडेल म्हणून सभेला येणाऱ्या लोकांनी घोषणा देऊ नयेत सामाजिक सलोखा बिघडेल असं कुठलंही वर्तन करु नये. ध्वनी प्रदुषणाचे नियम पाळावेत. लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहण्याची दक्षता घ्यावी.
याच अटी, शर्थींवरुन आणि सभेच्या नियोजनासंदर्भात औरंगाबादमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंच्या उपस्थितीत 400 पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही झालीय. तर रेकॉर्डब्रेक सभेचा दावा मनसेकडून होतोय. 1 मे रोजी मुंबईत फडणवीसांची पोलखोल सभा आहे. 30 एप्रिलला पुण्यात महाविकास आघाडीची सभा आहे. 14, 15 किंवा 16 मे पैकी एका तारखेला उद्धव ठाकरेंची सभा आहे. त्यामुळं जर महाविकास आघाडी आणि भाजपची सभा होऊ शकते तर मनसेची का नाही ? असा सवाल निर्माण होईल. राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेनं जय्यत तयारी केलीय. 20 हजार झेंड्यांनी औरंगाबाद भवगेमय केलं जाणार आहे. तर पोस्टरबाजीवरुन राज ठाकरेंचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आलाय. रोजीच्या औरंगाबादच्या सभेवरुन आता मनसे-शिवसेनाही आमनेसामने येताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्याच सभेच्या दिवशी, सुभाष देसाईच्या उपस्थितीत शिवसेनेचाही मेळावा होणार आहे.
