Special Report | बदललेले राज ठाकरे नेमके आहेत तरी कसे ?

Special Report | बदललेले राज ठाकरे नेमके आहेत तरी कसे ?

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 9:54 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्षसंघटनेवर बळ देताना दिसत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. तसंच येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवली जाणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.

पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वार वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्षसंघटनेवर बळ देताना दिसत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. तसंच येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवली जाणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांसोबत पंगतीत न बसता खुर्चीवर बसून जेवण करावं लागलं. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागसकर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनसे राज्य सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक वसंत मोरे, श्रीनिवास घाटगे हे देखील उपस्थित होते.