Special Report | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ताण आहे, पण ‘ताप’ नाही?

| Updated on: Jan 07, 2022 | 11:40 PM

कोविडच्या रुग्णाला आयसोलेशनदरम्यान सलग 3 दिवस ताप आला नाही, तर तो आठव्या दिवसापासून तो रुग्ण कोरोना निगेटिव्ह मानला जाईल. म्हणजे जर तुम्हाला कोरोना होऊन 7 दिवस झाले असतील, आणि त्यापैकी सलग 3 दिवस तुम्हाला ताप आलेला नसेल, तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मानलं जाईल.

Follow us on

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी केंद्र सरकारनं कोरोना रुग्णांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. ज्या लोकांना कोरोना झाला आहे आणि ते सध्या घरीच उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी केंद्रानं जारी केलेल्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत.

कोविडच्या रुग्णाला आयसोलेशनदरम्यान सलग 3 दिवस ताप आला नाही, तर तो आठव्या दिवसापासून तो रुग्ण कोरोना निगेटिव्ह मानला जाईल. म्हणजे जर तुम्हाला कोरोना होऊन 7 दिवस झाले असतील, आणि त्यापैकी सलग 3 दिवस तुम्हाला ताप आलेला नसेल, तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मानलं जाईल.

दुसरी महत्वाची सूचना ही ऑक्सिजन पातळीबाबत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची पातळी 95 हून खाली गेली तरी अनेकांना भीती वाटायची. मात्र आता नव्या गाईडलाईन्सनुसार जर कोरोना बाधिताची ऑक्सिजन पातळी ही 93 पर्यंत जरी खाली गेली, तरी चिंतेची गरज नाही. म्हणजे तुम्हाला श्वसनाचा त्रास नसेल, आणि घरातल्या बंद खोलीत तुमची ऑक्सिजन पातळी 93 वर गेली असेल, तरी ती सामान्य पातळी म्हणून समजली जाईल. याचा अर्थ अश्या रुग्णाची सुद्धा
सौम्य लक्षणं असलेला रुग्ण म्हणून नोंद होईल.