Special Report | 25 वर्षें जुन्या मित्रांमध्येच यापुढं मुख्य लढत?

Special Report | 25 वर्षें जुन्या मित्रांमध्येच यापुढं मुख्य लढत?

| Updated on: May 16, 2022 | 9:46 PM

भाजप आणि शिवसेनेची गेल्या 25 वर्षांतील मैत्री आता ही संपुष्टात आली असून बीकेसी मैदानावर झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील वार पलटवारनंतर ही मैत्री संपल्याचेच लोक सांगत आहेत. तर यांच्यातच पुढे मुख्य लढत लागलेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची बीकेसीतील मैदानावर हायव्होल्टेज सभा झाली. त्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलेच तापलं. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदूत्व, हनुमान चालीसा, नवनीत राणा राज ठाकरे (Raj Thackeray),मशीदीवरील भोगे, भाजपकडून वारंवार होणारी टीकांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले. तसेच याच सभेत शिवेसनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरूवात केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र याचसभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार पलटवार केला. त्यावेळी त्यांनी ‘आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे आणि बाकीच्यांचं घंटाधारी असं मी म्हणालो होतो. त्यावर फडणवीस बोलले. आमचं हिंदुत्व होतं हे गधाधारी होतं पण आम्ही अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सोडलं. जी गाढवं घोड्याच्या आवेषात होती त्यांनी लाथ मारायच्या ऐवजी आम्ही त्याला लाथ मारली’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला होता. त्याचा समाचार बीकेसीतील मैदानावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तसेच फडणवीस यांनी बाबरीवरूनही मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले‘बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा’,असा इशाराच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यामुळे मागील 25 वर्षें जुन्या मित्रांमध्येच यापुढं मुख्य लढत होणार अशीच सध्या राज्याच्या जनतेत आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सध्या सुरू असणाऱ्या आरोप- प्रत्यारोप आणि वार-पलटवारावरून हे तर्क लावले जात आहेत.

Published on: May 16, 2022 09:46 PM