Special Report : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वार-प्रतिवारात संजय राऊत यांची ढाल

| Updated on: Jan 24, 2022 | 8:50 PM

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे खोडून काढत पलटवार केला आहे. राम मंदिर आंदोलनानंतर शिवसेनेसाठी अनुकूल लाट होती. सिमोल्लंघन केलं असंत तर दिल्लीत शिवसेनेचा झेंडा फडकला असता असं काल मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सिलेक्टिव्ह मेमरीनुसार विधान केल्याचं फडणवीस म्हणाले.

Follow us on

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे खोडून काढत पलटवार केला आहे. ‘राम मंदिर आंदोलनानंतर शिवसेनेसाठी अनुकूल लाट होती. सिमोल्लंघन केलं असंत तर दिल्लीत शिवसेनेचा झेंडा फडकला असता असं काल मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सिलेक्टिव्ह मेमरीनुसार विधान केलं’, असं फडणवीस म्हणाले.

1993च्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर प्रदेशात 180 उमेदवार लढवले होते. जेव्हा तुमची लाट होती. तेव्हा त्यापैकी 179 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. एकाचं वाचलं होतं. 1996मध्ये तुम्ही 24 उमेदवार लढवले, त्यापैकी 23 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं. 2002 साली 39 उमेदवार लढवले. सर्व 39 उमदेवारांचे डिपॉझिट जप्त झालं. शिवसेनेची लाट होती म्हणता तरीही लोकांनी तुम्हाला नाकारलं. 1993मध्येही नाकारलं. कारण लोकांना माहीत होतं राम जन्मभूमीच्या आंदोलनात सक्रियतेने कारसेवक होते. आणि संघ विचाराचे लोकं होते. संघ विचार परिवारातील लोकं होते. म्हणून सिलेक्टिव्ह मेमरीने बोलणं बंद केलं पाहिजे, असा टोला फडणवीसांनी लगावला.