Special Report | MNSची सभा झाली तर Aurangabad मध्ये दंगली? -tv9
1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र आतापर्यंत 6 पक्ष आणि संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला तीव्र विरोध केलाय. वंचित आघाडीनं तर थेट दंगलीची शक्यता व्यक्त केली. ज्यात राष्ट्रवादीनंही म्हटलंय की जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सभेला परवानगी देऊ नका..प्रकश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनंही पोलीस आयुक्तांना पत्र देऊन परवानगी नाकारण्याची मागणी केलीय.
1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र आतापर्यंत 6 पक्ष आणि संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला तीव्र विरोध केलाय. वंचित आघाडीनं तर थेट दंगलीची शक्यता व्यक्त केली. ज्यात राष्ट्रवादीनंही म्हटलंय की जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सभेला परवानगी देऊ नका..प्रकश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनंही पोलीस आयुक्तांना पत्र देऊन परवानगी नाकारण्याची मागणी केलीय. मंत्री बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचाही विरोध आहे, मौलादा आझाद विचार मंच आणि गब्बर अॅक्शन संघटना आणि ऑल इंडिया पँथर सेनेनंही राज ठाकरेंच्या सभेला विरोध केलाय. राज ठाकरेंच्या सभेला विरोध होत असला तरी मनसेकडून सभेची तयारी सुरु झालीय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची सभेसंदर्भात बैठकही पार पडली. राज ठाकरेंनी सध्या मशिदीवरील भोंग्यांचा विषय हाती घेतलाय..आणि आता मनसे भोंग्यांवरुन मशिदीतल्या CCTVवरही आलीय..मंदिरात सीसीटीव्ही मग मशिदीत का नाही ?, असा सवाल मनसेनं केलाय.
