Special Report | राऊत कोठडीत;आता पत्नीची मॅरेथॉन चौकशी-tv9
अलिबागमधील जमिनीचे 4 प्लॉट आणि दादरमधील खरेदी केलेला फ्लॅट वर्षा राऊतांच्याच नावावर आहे. प्रवीण राऊतांकडून जे पैसे आले, त्याचा वापर जमिन आणि फ्लॅट खरेदीत केल्याचा संशय ईडीला आहे.
संजय राऊतांपाठोपाठ त्यांच्या पत्नी वर्षा राऊतांचीही ईडीनं कसून चौकशी केलीय…राऊतांची दुसऱ्यांदा ईडी कोठडी मिळवल्यानंतर, ईडीनं वर्षा राऊतांनाही समन्स बजावलं होतं…त्यानुसार वर्षा राऊत ईडीसमोर हजर झाल्या. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात चौकशी करताना, राऊतांचे 2 व्यवहार ईडीच्या हाती लागलेत..त्यामुळं चौकशीची आच वर्षा राऊतांपर्यंत आली.ईडीच्या आरोपांनुसार, प्रवीण राऊतांकडून 1.6 कोटी संजय राऊत आणि वर्षां राऊतांच्या अकाऊंटवर आले. वर्षा संजय राऊतांच्या खात्यात 1 कोटी 8 लाखांची रक्कम आलीय. आता ही रक्कम कोणी पाठवली त्याचाही शोध ईडीला घ्यायचा आहे. अलिबागमधील जमिनीचे 4 प्लॉट आणि दादरमधील खरेदी केलेला फ्लॅट वर्षा राऊतांच्याच नावावर आहे. प्रवीण राऊतांकडून जे पैसे आले, त्याचा वापर जमिन आणि फ्लॅट खरेदीत केल्याचा संशय ईडीला आहे.
Published on: Aug 06, 2022 09:24 PM
