Special Report | ईडी चौकशीआधी भावना गवळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला?

Special Report | ईडी चौकशीआधी भावना गवळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला?

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 9:15 PM

4 ऑक्टोबरला सोमवारी भावना गवळी मुख्य कार्यालयात हजर राहण्याचा समन्स जारी झाला आहे. ईडी च्या कार्यालयात जाण्यापूर्वी भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंधरा ते वीस मिनिटांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर भावना गवळी शिवसेनेच्या मुंबईतील शिवालय कार्यालयात आल्या होत्या. टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने गवळी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेलया.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावरही सोमय्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय. त्यानंतर ईडीचा ससेमिरा गवळी यांच्यामागे लागला आहे. ईडीचं समन्स आल्यानंतर मागील दोन दिवस भावना गवळी नॉट रिचेबल होत्या. त्यानंतर आज त्या दुपारी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या. अर्धा तास थांबल्यानंतरही त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्या तिथून निघून गेल्या. मात्र, तीन तासानंतर गवळी पुन्हा वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या. त्यानंतर 15 मिनिटे त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.