Special Report | Uddhav Thackeray | ठाकरे म्हणतात शिंदेंना विचारलं होतं मुख्यमंत्री व्हायचंय का ?-tv9

Special Report | Uddhav Thackeray | ठाकरे म्हणतात शिंदेंना विचारलं होतं मुख्यमंत्री व्हायचंय का ?-tv9

| Updated on: Jul 27, 2022 | 9:25 PM

शिंदेंनी शिवसेनेवरही दावा केलाय...आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विटरवर त्यांनी ठाकरेंचा पक्षप्रमुख उल्लेख टाळत, माजी मुख्यमंत्री म्हटलंय. तर शिंदेंमध्ये सत्तापिपासूपणा असून त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचं असून पुढे मोदींना पंतप्रधानपदही मागतील, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय.

मुलाखतीच्या पहिल्या भागात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदेच होते..आता दुसऱ्या भागातंही पुन्हा उद्धव ठाकरेंनी पुन्हा धारदार शब्दांनी वार केलेत. पालापाचोळा म्हटल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विश्वासघातकी आणि सत्तापिपासू म्हटलंय. अडीच वर्षांआधी स्वत:च मुख्यमंत्री झालो..मग तुम्हाला प्रॉब्लेम काय ?, असा सवाल करतानाच, उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या कल्याणमधील भाषणाचाही उल्लेख केला. ज्यात शिंदेंनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं. कल्याणच्या भाषणात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते, तेही ऐका. शिंदेंनी शिवसेनेवरही दावा केलाय…आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विटरवर त्यांनी ठाकरेंचा पक्षप्रमुख उल्लेख टाळत, माजी मुख्यमंत्री म्हटलंय. तर शिंदेंमध्ये सत्तापिपासूपणा असून त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचं असून पुढे मोदींना पंतप्रधानपदही मागतील, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय.

Published on: Jul 27, 2022 09:25 PM