SSC Exam 2025 : दहावीचा पहिलाच पेपर फुटला… परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की, VIDEO बघून तुम्हीही म्हणाल…

SSC Exam 2025 : दहावीचा पहिलाच पेपर फुटला… परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की, VIDEO बघून तुम्हीही म्हणाल…

| Updated on: Feb 21, 2025 | 5:00 PM

पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटलेला आहे. जालना, यवतमाळ आणि जळगावमध्ये मराठीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी झाली. पेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिक्षण विभागाच मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

दहावी परीक्षेसाठी केलेले सर्व दावे पेपरच्या पहिल्याच दिवशी फोल ठरले. दहावीचा मराठीचा पेपर फुटलाय. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. शाळेच्या भिंतींवरून उड्या मारून हॉलमध्ये कॉपी पुरवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. जालन्याच्या बदनापूरात सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिक्षण विभागाचे कर्मचारी असताना देखील कॉपी पुरवण्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय. शहरातील झेरॉक्स सेंटर मधून प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्यात. दुसरीकडे जालन्यातच मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सुद्धा कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती. परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवली जाताना शिक्षण विभागाच मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता होतोय.

जळगावमध्ये सुद्धा दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. काही परीक्षा केंद्राबाहेर कॉपी बहाद्दरांकडून सर्रासपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर आलंय. परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसून आले. तर तिकडे यवतमाळच्या महागावात सुद्धा पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटलाय. पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तर शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी इथल्या शाळेत चौकशी सुरू झाली. दरम्यान पेपरफुट्टीची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Published on: Feb 21, 2025 05:00 PM