Haji Arafat | अनिल परब यांना आव्हान, एकही खासगी बस राज्यात चालवून दाखवा – हाजी अराफत

| Updated on: Nov 16, 2021 | 6:55 PM

अनिल परब एसटी कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. मराठी भूमिपुत्रांना आंदोलन करावं लागत आहे. भाजप नव भारतीय शिववाहतूक युनियन या आंदोलनात उतरणार आहे. सात लाख बसेस आहेत. ही सगळ्यात मोठी संघटना आहे. आजपासून खासगी बसेस आम्ही बंद करत आहोत. राज्यात खासगी युनिनयच्या बसेस बंद करणार. केवळ नॅशनल परमिट असलेल्या बसेस चालणार आहे. राज्यातील बसेस जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बंद राहणार, असा इशारा हाजी अराफात यांनी दिलाय.

Follow us on

विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा मागील आठवड्याभरापासून बेमुदत संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही एसटी कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर हाजी अराफात यांनीही आता ठाकरे सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना आव्हान दिलंय. आजपासून भाजप नव भारतीय शिववाहतूक युनियन एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उतरणार असल्याची घोषणाच अराफात यांनी केलीय.

अनिल परब एसटी कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. मराठी भूमिपुत्रांना आंदोलन करावं लागत आहे. भाजप नव भारतीय शिववाहतूक युनियन या आंदोलनात उतरणार आहे. सात लाख बसेस आहेत. ही सगळ्यात मोठी संघटना आहे. आजपासून खासगी बसेस आम्ही बंद करत आहोत. राज्यात खासगी युनिनयच्या बसेस बंद करणार. केवळ नॅशनल परमिट असलेल्या बसेस चालणार आहे. राज्यातील बसेस जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बंद राहणार, असा इशारा हाजी अराफात यांनी दिलाय. एकही खासगी बस राज्यात चालवू देणार नाही, असं आव्हानच हाजी अराफात यांनी दिलंय.