Kunal Kamra : ‘कलाकाराला संवैधानिकरित्या कसं मारायचं अन्…’, कामराने पुन्हा सरकारला डिवचलं, ‘त्या’ ट्वीटची चर्चा
कुणाल कामरा याने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर भाष्य करत एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कामराने कलाकाराला संवैधानिकरित्या कसं मारायचं यांचं मार्गदर्शन, असं म्हणत काही मुद्दे मांडले आहे.
स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर विडंबनात्मक टीका केली. यानंतर कुणाल कामरावर काही ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले. असं असतानाही कुणाल कामरा काही मागे हटताना दिसत नाही. अशातच कुणाल कामरा याने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधल्याचे समोर आले आहे. कुणाल कामराने मिश्कील ट्वीट करत पुन्हा एकदा सरकारला डिवचलं आहे. एखाद्या कलाकाराला संवैधानिकरित्या कसं मारायचं यांचं मार्गदर्शन.. असं म्हणत कुणाल कामराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मिश्किल भाष्य केले आहे. तर कलाकाराला त्याचं काम सुरू होण्याच्या आधीच थांबवण्यास भाग पाडणं, कलाकाराला खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम मिळू नये अशी परिस्थिती निर्माण करणं, मोठे क्लब कार्यक्रमासाठी जागा देण्याची जोखीम पत्करणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण करणे, प्रेक्षकांना समन्स पाठवणे, कलेला क्राईम सीन बनवणे यासह कलाकाराला त्याचा आत्मा विकायला भाग पाडणे किंवा शांत करणे, कलाकाराला शांत करण्यासाठी राजकीय शस्त्र वापरणे असे काही मुद्दे कुणाल कामराने आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहेत.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
