‘दहावीच्या लिव्हिंग सर्टीफिकीटवर जात असते, तिच पुढे…,’ काय म्हणाले बावणकुळे

‘दहावीच्या लिव्हिंग सर्टीफिकीटवर जात असते, तिच पुढे…,’ काय म्हणाले बावणकुळे

| Updated on: Jan 18, 2025 | 2:24 PM

१५ हजार गावात पहिल्या फेजमध्ये स्वामित्व कार्ड मिळणार आहे. घर असूनही लोन घेण्यासाठी तर इतर कारणासाठी ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांना हे कार्ड मिळणार आहे असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखऱ बावणकुळे यांनी म्हटले आहे.

स्वामित्व योजनेतील आहे गावातील वाड्यापाड्यातील धनगर आणि आदिवासींना त्यांच्या घराच्या प्रॉपर्टी कार्डच्या वाटर होत आहे. गेली अनेक वर्षे ज्यांच्या घर आहे पण प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांना
प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, स्वामित्व कार्ड मिळण्याची योजना आणल्याबद्दल आपण १४ कोटी जनतेच्यावतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखऱ बावणकुळे यांनी म्हटले आहे. विकसित महाराष्ट्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.१५ हजार गावात पहिल्या फेजमध्ये स्वामित्व कार्ड मिळणार आहे. घर असूनही ज्यांना लोन घेण्यासाठी तर इतर कारणासाठी प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांना हे कार्ड मिळणार आहे असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखऱ बावणकुळे यांनी म्हटले आहे. पारधी समाजाच्या प्रश्नांबद्दल आपण विभागीय आयुक्तांकडे आपण बोललो आहोत. येत्या २४ -२५ जानेवारीपासून सर्वच पारधी समाजाला जातीचा दाखला मिळणार आहे. यासाठी सरकार सखोल काम करणार आहे. लक्ष्मण हाके यांनी मोर्चे काढण्याची घोषणा केली आहे, याविषयी विचारले असता त्यांनी आज या योजनेविषयी बोलूयात असे सांगत  त्यांनी अधिक बोलणे टाळले आहे. दहावीच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख केला गेला आहे. याविषयी विचारले असता दहावीच्या लिव्हिंग सर्टीफिकीटवर जात असते तिच पुढे फॉर्वर्ड केली जाते असे चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्पष्ट केले.

Published on: Jan 18, 2025 02:23 PM