महिलांनो आता घाबरू नका… स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर

महिलांनो आता घाबरू नका… स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर

| Updated on: Feb 28, 2025 | 5:55 PM

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि यामध्येच महिलांच्या सुरक्षेसाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय सुद्धा झाल्याची माहिती मिळतेय.

स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्य महिला आयोग अॅक्शन मोडवर आला आहे. घडलेल्या प्रकारानंतर बस स्थानकामध्ये महिलांसाठी स्वतंत्र चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क उभारणार येणार आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि यामध्येच महिलांच्या सुरक्षेसाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय सुद्धा झाल्याची माहिती मिळतेय.

बस स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क असणार

बीट मार्शल आणि दामिनी पथकांची गस्त आता वाढवली जाणार

बस स्थानकातील बंद पडलेल्या बसेस 15 एप्रिल पर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्यात येणार

हिरकणी कक्ष अद्ययावत कऱण्यात येणार

महिलांसाठी विशेष पिंक ऑटो रिक्षांची संख्या वाढवण्यात येणार

बसेस पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यासह बस स्थानक परिसरामध्ये केवळ गरजेपुरत्याच बसेस थांबवण्यात याव्यात, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. यासोबतच बस स्थानक परिसर आणि सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे यासंदर्भातल्या सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत. तर टोल फ्री नंबर 112 चे फलक महिलांना दिसतील अशा भागांतच असावेत. तर शाळा कॉलेजेस मधून 1098 या टोल फ्री नंबर संदर्भात जनजागृती करण्यात यावी, अशी सुद्धा यावेळी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.

Published on: Feb 28, 2025 05:55 PM