Nagpur Violence Video : नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?

Nagpur Violence Video : नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 18, 2025 | 10:25 AM

औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने-सामने आले आणि नागपुरच्या महाल परिसरात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आलमगीर औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलेच आरोप प्रत्यारोप होताना दिसताय. अशातच काल नागपूर शहरात देखील औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. या मुद्द्यावरूनच नागपूर शहरात काल रात्री दोन गट आमने सामने आलेत आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. हा राडा नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून झाल्याची माहिती समोर येत आहे. औरंगजेबाची कबर हटवा, या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हा राडा झाला. या राड्यादरम्यान, दोन गट आक्रमक झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक देखील केली. दोन गटात झालेल्या राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दोन गटातील काही लोकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यावेळी काही पोलीस जखमी झाले. रात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान, 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर ज्या परिसरात हा राडा झाला त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांकडून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

Published on: Mar 18, 2025 10:25 AM