Sunil Shetty : मुंबईत राहून मराठी आलं नाही तर.., हिंदी भाषेच्या वादावर सुनील शेट्टीचं मोठं विधान
Actor Sunil Shetty : अभिनेता सुनील शेट्टी याने हिंदी सक्तीवर भाष्य करत मराठी भाषेविषयी दाखवलेल्या आदराने त्याचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.
मी कर्नाटकचा आहे म्हणून मला मराठी आली नाही तरी चालेल. पण मराठी आले तर तुम्हा सर्वांना बरं वाटतं. मात्र मला मराठी नाही आली तर दुसऱ्यांना नाहीतर मला त्रास झाला पाहिजे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायचे आहे, असं म्हणत सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याने आपला मराठी भाषेबद्दल असलेला आदर दाखवून दिला आहे. त्याच्या या कृतीचे त्यांच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे. आज अभिनेता सुनील शेट्टीने शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनील शेट्टीने राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.
यावेळी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, माझी जन्मभूमी कर्नाटक असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. मी इथे काम करतो, इथं मी वाढलोय. त्यामुळं मला मराठी येणं गरजेचं आहे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायची आहे, असंही त्याने सांगितलं.
