Sunil Shelke : पैशात तोलु नका, नाहीतर उरलेसुरले सुद्धा..; सुनील शेळकेंचं राऊतांना थेट प्रत्युत्तर

Sunil Shelke : पैशात तोलु नका, नाहीतर उरलेसुरले सुद्धा..; सुनील शेळकेंचं राऊतांना थेट प्रत्युत्तर

| Updated on: Jun 17, 2025 | 12:42 PM

Sunil Shelke Slams Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मावळ संदर्भात केलेल्या विधानानंतर सुनील शेळके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मावळच्या जनतेला पैशात तोलु नका, नाहीतर उरलेसुरले सुद्धा.. अशा शब्दात सुनील शेळके यांनी राऊतांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्यावेळी मी स्वत: संजय राऊतांना मतदान केलं, असंही शेळकेंनी म्हंटलं आहे. मतदान केल्यावर राऊतांनी पैसे दिले का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी बोलताना शेळके म्हणाले की, 2022 च्या जून महिन्यात राज्यसभेची निवडणूक होती. त्यावेळी संजय राऊत साहेबांना मी स्वत: मतदान केलं होतं. आमच्या पक्षाच्या कोट्यातून मला राऊतांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि मी त्यांना मतदान केलं होतं. त्यांनी काय मला पैसे दिले होते का? मी मतदान केलं त्याचे त्यांनी मला पैसे आणून दिले का? त्यामुळे आजच्या परिस्थितीत तरी राऊतांनी अशा गोष्टी बोलू नये आणि माझ्या मावळच्या जनतेला पैशात तोलू नका, नाहीतर उरलेसुरले सुद्धा.. , असा थेट इशाराच आता शेळके यांनी दिला आहे.

 

Published on: Jun 17, 2025 12:42 PM