SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 02 October 2021
भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळायला सुरुवात झाली होती. आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत उडालेल्या गोंधळानंतर ही परीक्षा सुरळीत पार पडणार का, हे पाहावे लागेल.
पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीच्या या जागांसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अवघ्या 214 जागांसाठी 39,323 जणांनी अर्ज केले आहेत.