SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 26 August 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 26 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 8:27 AM

सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्यालाच आता राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?, असा सवालही राणेंनी विचारलाय.

राज्याचं राजकारण केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंमुळे ढवळून निघालंय. नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील विधानानंतर त्यांची अटक होऊन सुटकाही झाली. आज नारायण राणेंनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?, शिवसेनेत सगळेच मंत्री गँगस्टर आहेत का?, असा थेट सवाल नारायण राणेंनी शिवसेनेला विचारलाय.

सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्यालाच आता राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?, असा सवालही राणेंनी विचारलाय.

चिपळूणला झेंडो दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. 13 माणसं. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे कारायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं, असा सल्ला राणे यांनी पोलिसांना दिला.