SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 28 June 2021

| Updated on: Jun 28, 2021 | 8:45 AM

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले असून संपूर्ण राज्यात निर्बंधाचा एकच स्तर म्हणजे तिसरा स्तर लागू करण्यात आला आहे.कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे सर्व राज्यभर स्तर 3 चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Follow us on

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले असून संपूर्ण राज्यात निर्बंधाचा एकच स्तर म्हणजे तिसरा स्तर लागू करण्यात आला आहे.कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे सर्व राज्यभर स्तर 3 चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ठाणे शहरामध्ये म्हणजे महापालिका क्षेत्रांतर्गत निर्बंधाचा स्तर हा दोन होता. यामुळे सर्व व्यवहार खुले झाले होते.मात्र जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी काढलेल्या आदेशामध्ये आता राज्यात सर्वत्र एकच स्तर म्हणजे तिस-या स्तराचे निर्बंध लागू असल्याने ठाण्यात सर्व व्यवहार संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी पाचनंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल.