मी आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही, कारण..; लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

मी आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही, कारण..; लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jul 29, 2025 | 2:03 PM

खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेत 4800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेत 4800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करून खळबळ उडवली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, पण मी यासाठी खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही आणि करणारही नाही. सरकार कसे चालते, हे मला माहीत आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणावरही खोटे आरोप करणार नाही.” त्यांनी आदिती तटकरे यांच्यावर थेट आरोप करण्याचे टाळले, परंतु त्यांच्या संशयाची सुई कोणाकडे आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवताना म्हटले की, लाडकी बहीण योजनेत 4800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सरकारने दिलेल्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होते. हा घोटाळा कोणी केला, कसा केला, यात कोणाचा सहभाग आहे, बँकेचा आहे की इतर कुणाचा, हे आता स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या आरोपांनंतर आता सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 29, 2025 12:41 PM