Supriya Sule : पुण्यात दादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात ताईंचा सहभाग

Supriya Sule : पुण्यात दादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात ताईंचा सहभाग

| Updated on: Jun 24, 2025 | 9:08 AM

Supriya Sule - Ajit Pawar : खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

अजित पवार गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या वैशाली नागवडे यांच्या उरळी कांचनमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे दादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात ताईंनी उपस्थिती दर्शवल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकीकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेल्या काही सूचक विधानांनी या चर्चांना आणखी बळ मिळालं होतं. तर शरद पवार यांनी लबाड्या करणाऱ्यांना सोबत घेणार नाही म्हणत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र आता सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात हजर राहिल्याने नेमकं चाललंय काय ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Published on: Jun 24, 2025 09:08 AM