Supriya Sule : जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नसल्याचं संगत सुप्रिया सुळे यांनी मोठा खुलासा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या अफवांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी जयंत पाटील यांचा कोणताही राजीनामा पाहिलेला किंवा वाचलेला नाही. तुमच्या वृत्तवाहिनीला ही बातमी देणारा जो ‘सूत्र’ आहे, त्याच्या विश्वासार्हतेवर विचार करा. ही माहिती खात्रीलायक नाही आणि यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण होतो.” त्या पुढे म्हणाल्या, “मला अशा कोणत्याही राजीनाम्याबद्दल माहिती नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात याबाबत स्पष्टता येईल. मी जयंत पाटील यांच्याशी दररोज बोलते. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत, त्यावर मी काय बोलू?”
प्रदेशाध्यक्षपदात बदल होणार का, या प्रश्नावर सुळे यांनी सांगितले, “राजकीय पक्ष आणि संघटनेत प्रत्येक कार्यकर्ता दिलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार असतो. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी पक्षासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. कोणतेही आव्हान असले, तरी काल, आज आणि उद्याही ते लढण्यास तयार आहेत.” राजीनाम्याच्या चर्चा विरोधकांनी पसरवल्या का, यावर त्या म्हणाल्या, “ज्या गोष्टीत तथ्य नाही, त्यावर वेळ का वाया घालवायचा? प्रवीणदादा, महागाईसारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत.” याशिवाय, महाराष्ट्रातील एका मंत्र्याच्या घरी रोख रकमेच्या बॅग सापडल्याच्या प्रकरणावरही सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
