Phaltan Doctor Death : खचून जाऊ नका, मी… सुप्रिया सुळेंकडून डॉक्टर महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन अन् दिलं मोठं आश्वसन
फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत, पोलीस आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर मानसिक छळ केल्याचा दावा केला. त्यांनी या प्रकरणाची पारदर्शक एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली, ज्यावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांशी भेटण्याचे आश्वासन दिले.
फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या कथित आत्महत्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे. “खचून जाऊ नका, मी तुमच्यासोबत आहे,” असे सांगत सुळेंनी कुटुंबाला धीर दिला. कुटुंबाने या प्रकरणाची सखोल एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीची मागणी केली आहे. या मागणीवर सुप्रिया सुळेंनी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे.
मृत डॉक्टर संपदाचे चुलत भाऊ प्रमोद मुंडे यांनी सुप्रिया सुळेशी संवाद साधताना धक्कादायक आरोप केले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस प्रशासन आणि रुग्णालयातील कर्मचारी यात सहभागी असून, डॉ. संपदाला मानसिक त्रास देऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला. त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळेल.
