Phaltan Doctor Death : ‘त्या’ मध्यरात्री फलटणमधील हॉटेल रुम नंबर 114 मध्ये नेमकं झालं काय? जे घडलं त्यानं महाराष्ट्र हादरला
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मधुदीप हॉटेलमध्ये एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणात लैंगिक शोषणाचा आरोप असलेला पीएसआय गोपाल बदने स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आहे. तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका धक्कादायक घटनेत एका महिला डॉक्टरने मधुदीप हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. फलटण येथील मधुदीप हॉटेलमधील रुम नंबर ११४ मध्ये या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून, दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत ही बाब उघडकीस आली नव्हती, ज्यामुळे हा प्रकार उशिरा लक्षात आला.
या प्रकरणी पोलीस तपास करत असून, पीएसआय गोपाल बदने याच्यावर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. बदने रात्री स्वतःहून ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला, त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वीच प्रशांत बनकर नावाच्या दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

