Supriya Sule : नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule Press Conference : पावसात पुण्यातल्या अनेक भागांत पाणी तुंबलं आहे. त्यावरून आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पावसाळ्यात नाले तुंबतात मग कोट्यवधी रुपये कुठे खर्च करतात, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पावसाच पाणी तुंबण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत हा सवाल उपस्थित केला. वैज्ञानिक रित्या कामं होई पर्यंत शहरं तुंबत राहणार, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हिंजवलीला आम्ही मीटिंग घेऊन थकलो, आंदोलनं करून थकलो. पण महाराष्ट्र सरकारचं हे जे प्लॅनिंग आहे ते वैज्ञानिक दृष्ट्या होत नाही. रास्ते बनवताना जिथून पाण्याचा निचरा व्हायला हवा ती जागाच बंड करून टाकतात. नाले सफाईचे करोडो रुपये जातात कुठे? कोणताही वैज्ञानिक दृष्टिकोण न ठेवता नाले बुजवले जातात. म्हणून आज पाणी तुंबत आहे, असं सुळे यांनी म्हंटलं आहे.
Published on: Jun 19, 2025 06:14 PM
