‘धनंजय मुंडेंची गुंडागिरी संपलेली नाही’, पुन्हा हल्लाबोल तर परळी, शिरसाळ्यात धसांना काळे झेंडे अन्…
परळी आणि शिरसाळा इथं धसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर धसांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा हल्लाबोल केला. मुंडेंची गुंडागिरी संपलेली नाही, ही ठोकाशाही टिकणार नाही असं सुरेश धस म्हणाले.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतची बैठक उघड झाल्यानंतर सुरेश धसांवर चौफेर टीका झाली. त्यानंतर धस मसाजोगमध्ये आले तेव्हा धसांना काळे झेंडे दाखवले. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली. यावेळी मसाजोगच्या ग्रामस्थांनी आपला धसांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं. दुसरीकडे परळीमध्ये आणि शिरसाळ्यामध्ये धसांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मस्साजोगून परळीमध्ये आल्यानंतर सुरेश धसांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. परळीमध्ये शिरसाळ्यामध्ये सुद्धा धसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करत काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा झाली. काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं.
दरम्यान, ज्या नेत्यांनी आम्हाला काळे झेंडे दाखवायला लावले त्यांना देखील आमच्या मतदारसंघात काळे झेंडेच दिसतील, असा इशारा सुरेश धसांनी दिलाय. तर पीए प्रशांत महाजन यांच्यावर कारवाईमध्ये दिरंगाईचा आरोप आहे. बीड एसपी ऑफिसमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र अजूनही महाजन बीडमध्ये ड्युटी असताना केज पोलिस स्टेशनमध्ये येऊन लॅपटॉपवर काय करतात असा प्रश्नही धसांचा आहे. तर पीएसआय राजेश पाटील हे तर हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि गँग सोबत फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. पीएसआय राजेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. आणि तिसरं नाव आहे नितीन बिक्कड़. ज्या पवन चव्हाणशी संबंधित खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. ती खंडणीची बैठकच मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली. त्यामध्ये वाल्मिक कराड सह नितीन बिक्कड़ होता असा आरोप धसांचा आहे.
