PSI Ranjeet Kasle : बारमध्ये डान्स अन् हातात रायफल असलेल्या… बीडचे निलंबीत PSI रणजीत कासले यांचा व्हिडीओ व्हायरल
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा मोठा गौप्यस्फोट बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला होता. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला ५ ते ५० कोटी रूपयांची ऑफर दिली होती, असा दावा देखील त्यांनी केला होता.
बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणजीत कासले हे एका बारमध्ये डान्स करताना दिसताय. तर दुसरीकडे हातात रायफल असणाऱ्या सहकाऱ्यासोबतचं एक रील देखील रणजीत कासले यांचं व्हायरल होत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड आणि आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला सुपारी मिळाली होती. त्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर देखील देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा नुकताच बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न झाल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होते, असा गंभीर आरोप देखील रणजीत कासले यांनी केल्याचे पाहाला मिळाले होते.
