Swami Govindadev Giri : आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित, स्वामी गोविंददेव गिरींचे भाजपला खडेबोल
भाजपसारख्या संघाच्या राजकीय शाखांमध्ये इतर पक्षातून आलेल्या नेत्यांवर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी भाजप आणि संघ परिवाराला अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले असल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यांना संघ काय हे कधीच माहिती नव्हते, हिंदुत्व पटले नव्हते, नैतिकतेचा लवलेश नव्हता अशा आयारामांमुळे संघ परिवार प्रदुषित झाला आहे, असे विधान स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले असून त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले. इतकंच नाही तर “मृत्युंजय देशासाठी संघ आणि हिंदुत्व आवश्यक आहे, त्यामुळे संघ परिवाराने सावध राहण्याची गरज आहे”, असा सल्लाही स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिला आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी केलेल्या विधानातून संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपला ‘आयाराम संस्कृती’वरून अर्थात भाजपसारख्या संघाच्या राजकीय शाखांमध्ये इतर पक्षातून आलेल्या नेत्यांवर निशाणा साधत (आयारामांना) अप्रत्यक्ष खडसावले.
