Tapovan Tree Felling : कुणालाही न दुखवता अण्णा हजारे स्पष्ट बोलले…हा ही चांगला अन् तो ही.. अण्णांची भूमिका काय?
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी आपली भूमिका मांडली आहे. सरकारने लहान झाडे तोडण्याचे समर्थन करत, पर्यावरणाच्या दृष्टीने मोठ्या झाडांना वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणप्रेमींचा मात्र सरसकट वृक्षतोडीला विरोध आहे, तर सरकारने हैदराबादहून १५ हजार झाडे भरपाई म्हणून आणली आहेत.
नाशिकच्या तपोवनात संभाव्य वृक्षतोडीच्या मुद्द्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अखेर आपले मत व्यक्त केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. सरकारने १५ हजार झाडे हैदराबादहून भरपाई म्हणून आणली असताना, तपोवनात झाडे तोडण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. यावर अण्णा हजारेंनी सुरुवातीला सरकारला सवाल करत, पर्यावरणाच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी राष्ट्रीय संपत्ती आणि वन्यजीवांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले. मात्र, त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारच्या भूमिकेला समर्थन दिल्याचे दिसून आले. सरकारने १० वर्षांखालील छोटी झाडे तोडणार असल्याचे सांगितले आहे.
यावर अण्णा हजारेंनी मोठ्या झाडांऐवजी छोटी झाडे तोडावीत, असे मत व्यक्त केले. पर्यावरणप्रेमींचा मात्र सरसकट वृक्षतोडीला विरोध आहे. रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वनात साधूंच्या तात्पुरत्या निवासासाठी वृक्षतोड का, असा सवाल ते विचारत आहेत. एका नाशिककर नागरिकाने झाडे म्हणजे श्वास असून, तपोवन हे सुख, शांती आणि समाधानाचे केंद्र असल्याचे म्हटले. झाडांची कत्तल करणे चुकीचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे.