राज ठाकरेंचा थेट उद्धव ठाकरेंना फोन! मोठं कारण आलं समोर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठीच्या विजय मेळाव्यानंतर या दोघांनी काही आंदोलनेही एकत्र केली आहेत. या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनुसार, राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना फोन करून दादरमधील त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी सहकुटुंब येण्याचे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे कुटुंबासह राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले आहे.
Published on: Aug 24, 2025 01:15 PM
