Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या जवळच्या दोन नेत्यांची जेवणासाठी हॉटेलमध्ये भेट
Raj - Udhav Thackeray : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.
शाळांमध्ये हिंदी सक्ती केल्यानंतर आता ठाकरे बंधु आक्रमक झालेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यातच दोन्ही ठाकरेंच्या जवळचे समजले जाणारे 2 नेते आज एकमेकांना भेटले असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी दादरच्या हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली. या भेटीमुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ही भेट झाल्याचे कळते.
यावेळी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मराठी माणसासाठी सर्व एकत्र येतायत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अशी घटना पहिल्यांदाच घडतेय, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली.
Published on: Jun 27, 2025 03:57 PM
