Thackeray brothers : ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय नफा-तोटा काय? मुंबईत कोण ठरणार शक्तिशाली?

Thackeray brothers : ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय नफा-तोटा काय? मुंबईत कोण ठरणार शक्तिशाली?

| Updated on: Jun 28, 2025 | 10:36 AM

मराठी अस्मितेवरून दोन्ही ठाकरे बंधू एकजुटीची चर्चा होत असतानाच, येथे मुंबईत आमची सत्ता येणार असा दावा उत्तर भारतीय संघाने केला. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईच राजकारण कुणासाठी नफा- तोट्याचे ठरेल? मराठी ध्रुवीकरणामुळे ठाकरेंना फायदा झाला तर इतर भाषिकांचही ध्रुवीकरण होईल का?

अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच मोर्चात एकाच कारणावरून एकमेकांसोबत चालणार आहेत. दोघांच्या युतीच्या चर्चा झडत असतानाच हिंदी सक्तीच्या वादात दोघांना अजून जवळ आणलंय. मात्र मुंबई महापालिकेत दोन्ही ठाकरे एकत्र आले तर राजकीय गणित काय सांगतं? यावरूनही चर्चा झडू लागल्यात.

एक दावा असा आहे की, मराठी अस्मितेसाठी एकजुट झाल्यास मुंबईतला मराठी माणूस दोन्ही ठाकरेंच्या सोबत एकजुटीने उभा राहील. दुसरा युक्तिवाद होतोय की, दोन्ही ठाकरेंनी जरी मराठी मतदार केंद्रित केले तरी हिंदीच्या मुद्यावरून उत्तर भारतीयांची सुद्धा एकजूट होईल. उद्धव ठाकरेंचा मुंबईतला संघटन आणि राज ठाकरेंच वक्तृत्व यामुळे दोन्ही सेनांना प्रचंड यश मिळेल. तर याला खोडत काहींच मत असंय की, भाजपचेही अनेक वार्डात मराठी उमेदवार असल्यामुळे त्यांना हिंदी भाषिकांचे मतदान बोनस म्हणून मिळेल.

मराठीच्या मुद्यावर मुंबईला मराठी मतदार पक्षभेद विसरून केवळ भाषेच्या आधारावर दोन्ही ठाकरेंकडे आकर्षित होतील. राज ठाकरेंच्या काही आक्रमक भूमिकांमुळे उद्धव ठाकरेंना मानणारा हिंदी भाषिक आणि मुस्लिम वर्ग दुरावेल.एक गट मानतो की, दोन्ही बंधूंची युती झाल्यास मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि भाजपला सुद्धा नुकसान होऊ शकतं. तर दुसऱ्या बाजूला भाषेच्या मुद्यावरून दोघांची एकजुट झाल्यास हीच एकजुट इतर भाषिकांना भाजपच्या दिशेने वळवेल. असाही एक तर्क दिला जातोय.

Published on: Jun 28, 2025 10:36 AM