Thackeray Brothers : ही सुरुवात आहे.. आपले राज ठाकरे-उद्धव ठाकरे; ठाकरे बंधूंची खास निमंत्रण पत्रिका पाहिलीत का?

Thackeray Brothers : ही सुरुवात आहे.. आपले राज ठाकरे-उद्धव ठाकरे; ठाकरे बंधूंची खास निमंत्रण पत्रिका पाहिलीत का?

| Updated on: Jul 02, 2025 | 1:57 PM

Thackeray Brothers Melava : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्याची खास निमंत्रण पत्रिका आता समोर आली आहे.

सरकारने हिंदी भाषा सक्ती रद्द केल्यानंतर आता ठाकरे बंधु एकत्रित विजय मेळावा करत आहेत. या विजय मेळाव्याची तयारी आता सुरू झालेली आहे. येत्या 5 जुलै रोजी मुंबईच्या वरळी डोम येथे हा मेळावा होतं आहे. मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि ठाकरे सेना एकत्र आली आहे. त्यानंतर आता कित्येक वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एका मंचावर बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याच मेळाव्यातून ठाकरे बंधु युतीची घोषणा करतील का? याकडे देखील राजकीय वर्तुळासह महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे.

दरम्यान, आता या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांनी टायर केलेल्या निमंत्रण पत्रिका आता समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेवर ठाकरे बंधूंचं एकत्र नाव देखील बघायला मिळालं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं आहे. मग ही सुरुवात आहे. आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे राज ठाकरे-उद्धव ठाकरे… असा मजकूर या निमंत्रण पत्रिकेवर पाहायला मिळत आहे.

Published on: Jul 02, 2025 01:56 PM