भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले, पण का अन् कुठं झाली धक्काबुक्की?
कुडाळ तालुक्यातील मठ- पणदूर -घोडगे राजमार्गाचे भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून आज संध्याकाळी ठाकरे सेना आणि भाजप कार्यकर्ते सामने येत एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडला आहे. डिगस गावात हा प्रकार घडला.
सिंधुदुर्ग, २२ डिसेंबर २०२३ : कुडाळ तालुक्यातील मठ- पणदूर -घोडगे राजमार्गाचे भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून आज संध्याकाळी ठाकरे सेना आणि भाजप कार्यकर्ते सामने येत एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडला आहे. डिगस गावात हा प्रकार घडला.या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदार वैभव नाईकासह ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना हे काम करून देण्यापासून भाजप कार्यकर्त्यांनी रोखत जोरदार घोषणाबाजी केली. यावरून यावेळी एकमेकांच्या अंगावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते धावून गेले. त्यामुळे कुडाळ मालवण मतदार संघात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध ठाकरे सेना हे आमने-सामने आले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जयघोषासह निलेश राणेंच्या जयघोषाच्या जोरदार घोषणा देत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना तिथून हुसकावून लावले. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आणी भाजप कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर जात भिडले. यावेळी वातावरण काहीकाळ तंग झाले होते. मठ-पणदूर-घोडगे या राजमार्गाच्या पाच किलोमीटर मच्या डांबरीकरणासाठी ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.या कामाच्या भूमिपूजनासाठी आज संध्याकाळी आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते.हे समजताच भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.आणी ह्या भूमिपूजनावरून जोरदार राडा झाला.
