मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का? काँग्रेसला ही गळती; शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी भरती

मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का? काँग्रेसला ही गळती; शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी भरती

| Updated on: Aug 27, 2023 | 9:23 AM

आगामी लोकसभा आणि विधानसेभेच्या पार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गटास चांगले दिवस आले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेत माजी आमदारांसह आजी माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते प्रवेश करत असतात. आताही ठाकरे गटासह काँग्रेसला मुंबईत गळती लागली आहे.

मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा आणि विधानसेभेच्या निवडणुका या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटात पडलेली फूट आणि त्यानंतर लागलेली गळती काही थांबलेली नाही. अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आताही मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर काँग्रेसला देखील मोठी गळती लागली आहे. तर काँग्रेसमधून शिंदे गटात असा प्रवेश पहिल्यांदाच झाला आहे.

मुंबईत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. तर शिंदे यांच्या गटात ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांनी प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तर त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी समृद्धी काते यांनी देखील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

याचदरम्यान काँग्रेसलाही शिवसेनेकडून धक्का बसला असून मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सातही माजी नगरसेवक वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघ असलेल्या धारावीतील आहेत.

Published on: Aug 27, 2023 08:52 AM